India vs South Africa 1st Test: अल्गल-डी कॉकच्या शतकाने आफ्रिकेचा डाव सावरला, 385/8
विशाखापट्टणम | भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. दुसर्या दिवशी भारताने 502 धावा काढून पहिला डाव घोषित केला. तिसर्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने 8 गडी गमावून 385 धावा केल्या. भारताला अजूनही 117 धावांची आघाडी आहे. तिसर्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सेनुरान मुथुसामी (12) आणि केशव महाराज (3) फलंदाजी करीत होते.
दक्षिण आफ्रिकेकडून 160 धावा करणाऱ्या सलामीवीर डीन एल्गरला रवींद्र जडेजाने बाद केले. एल्गारने 286 चेंडूंचा सामना केला आणि बाद होण्यापूर्वी त्याने 18 चौकार आणि 4 षटकार लगावले.
कर्णधार डु प्लेसिस बाद झाल्यानंतर यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने शानदार शतक ठोकले. डी कॉकने 149 चेंडूत 15 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केले. एल्गरबरोबर डी कॉकने सहाव्या विकेटसाठी 164 धावांची भागीदारी केली. दुसर्या दिवशी नाबाद परतलेल्या डीन एल्गरने तिसर्या दिवशी षटकारांसह आपले शतक पूर्ण केले. त्याने 175 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने शतक गाठले. 2010 पासून भारतामध्ये कसोटी शतक झळकावणारा एल्गार हा पहिला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज आहे. हाशिम आमलाने 9 वर्षांपूर्वी शतक झळकावले होते.