India Vs South Africa, 1st Test Live Score: कसोटी रोहितची अन् टीम इंडियाचीही

Lokmat

Lokmat

Author 2019-10-02 08:44:14

Lokmat02 Oct. 2019 08:44

विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून सुरु होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ‘हिटमॅन’ रोहित शर्माकडून मोठी अपेक्षा ठेवेल. ...

img

विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून सुरु होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ‘हिटमॅन’ रोहित शर्माकडून मोठी अपेक्षा ठेवेल. सलामीवीर म्हणून आपला फॉर्म कसोटी क्रिकेटमध्येही कायम ठेवावा, अशीच त्याच्याकडून आशा असेल. कसोटी मालिकेपूर्वी रोहितला सलामीवीर फलंदाज म्हणून संधी देण्याचा प्रयोग विशेष यशस्वी ठरला नाही. मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव सराव सामन्यात डावाची सुरुवात करताना रोहितला खातेही उघडता आले नव्हते.

संदर्भ पढ़ें

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN