INDvSA; रोहित द्विशतकापासून एक धाव दूर

Pudhari

Pudhari

Author 2019-10-20 15:27:09

img

रांची: पुढारी ऑनलाईन

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होत असणाऱ्या तिसऱ्या कसोटीत पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या भारताची दमदार सुरूवात झाली. आज दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाल्यानंतर अजिंक्य रहाणेने आपले ११ वे कसोटी शतक पूर्ण केले. तर लंट टाईम झाला तेव्हा रोहित शर्मा कसोटी द्विशतकापासून केवळ एक धाव दूर आहे. भारताच्या ४ बाद ३५७ धावा झाल्या आहेत.

कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाची ३ बाद ३९ अशी अवस्था झाल्यानंतर अजिंक्य-रोहित जोडीने सामन्याची सूत्रे हाती घेत आफ्रिकन गोलंदाजांवर वर्चस्व राखले. पहिल्याच दिवशी रोहितने मालिकेतील तिसरे शतक साजरे केले. त्यानंतर अजिंक्य रहाणेनेही आजचा खेळ सुरू झाल्यानंतर शतक फटकावले. दोघांनी मिळून २५२ धावांची भागिदारी उभारली मात्र ११५ धावांवर खेळत असताना अजिंक्य रहाणे जॉर्ज लिंडेचा बळी ठरला. त्यानंतर आलेल्या रविंद्र जडेजाच्या साथीने रोहितने खेळ पुढे चालू ठेवला. आता तो कसोटी द्विशतकापासून केवळ एक धाव दूर आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN