INDvsBAN : धावा कर नाहीतर.. गावसकरांची 'या' प्रमुख खेळाडूलाच धमकी

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-01-04 16:05:53

img

राजकोट : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात बांगलादेशने भारताचा धक्कादायक पराभव केला. या सामन्यात बांगलादेशने भारताला सात गडी राखून विजय मिळवला. पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात सगळे फलंदाज फेल ठरले. मात्र,शिखर धवनने अत्यंत स्लो फलंदाजी केल्याने त्याच्यावर जास्त टीका केली जात आहे. एवढ्या प्रमुख खेळाडूकडून अशा स्लो खेळाची अपेक्षा कोणीच केली नव्हती.  

पहिल्या सामन्यात त्याने 42 चेंडूत 41 धावा केल्याने त्याच्यावर टीका होत आहे. त्याच्या या स्लो खेळाची भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी समाचार घेतला आहे. ट्वेंटी20 संघात स्तान कायम राकायचं असले तर तुला खेळावं लागले अशा शब्दांत त्यांनी धवनला इशारा दिला आहे. 

img

ते म्हणाले,"जर धवन पुढच्या दोन ट्वेंटी20 सामन्यात धावा करू शकला नाही कर त्याच्यावर नक्कीच टीका होईल. तुम्ही 40-45 धावा करण्यसाठी जेव्हा तेवढेच चेंडू वापरत तेव्हा त्याचा संघाला काही फायदा होत नाही. पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी20 विश्वकरंडकात धवनची संघाला जास्त गरज आहे.''

T20 World Cup 2020 : गिलख्रिस्ट म्हणतो बघा हाच संघ असेल विश्‍वविजेता

याआधी विजय हजारे करंडक स्पर्धेतही धवनला चांगली फलंदी करता आली नव्हती. सात डावांमध्ये धवननं फक्त 1 अर्धशतक लगावले होते. तर, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दौऱ्यातही धवनला चांगली कामगिरी करता आली नाही.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN