INDvsBAN 2nd T20 : ८ गडी राखून भारताचा विजय

Zee News

Zee News

Author 2019-11-08 02:10:24

img

नवी दिल्ली : भारतविरुद्ध बांगलादेश दुसर्‍या टी -२० सामन्यात रोहित शर्माच्या धमाकेदार खेळीमुळे भारताने बांगलादेशला धूळ चारली आहे. गुरुवारी झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने ८ गडी राखून विजय मिळविला. पहिल्या टी -२० सामन्यात बांगलादेशने भारताचा सात गडी राखून पराभव केला होता.

भारतविरुद्ध बांगलादेश दुसरा टी-२० सामना राजकोट येथे खेळला गेला. रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशची चांगली सुरुवात झाली मात्र २० ओव्हरमध्ये सहा गडी राखून १५३ धावाच करू शकला. भारतीय संघाने अवघ्या १५.४ ओव्हरमध्ये २ गडी गमावून १५४ धावा करुन सामना जिंकला.

रविवारी, १० नोव्हेंबर रोजी तिसरा टी -२० सामना खेळला जाणार आहे.

भारतविरुद्ध बांगलादेश पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला होता. भारताविरुद्ध बांगलादेशचा हा पहिलाच टी-२० विजय होता. भारताने दिलेलं १४९ रनचं आव्हान बांगलादेशने १९.३ ओव्हरमध्ये पूर्ण केलं होतं. त्यानंतर गुरुवारी भारताने दुसरा जिंकत १-१ अशी बरोबरी केली आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD