INDvsSA : दक्षिण आफ्रिकेच्या शेपटाचा प्रतिकार

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-10-12 17:14:50

img

ज्ञानेश भुरे

पुणे : भारताच्या पहिल्या डावातील 601 धावांचा पाठलाग करताना अडतचणीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दक्षिण आफ्रिका डावाला त्यांच्या शेपटाने म्हणजे तळातील फळीने आधार दिला. चहापानाला खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकने पहिल्या डावात 8 बाद 197 धावा केल्या होत्या. व्हर्नान फिलॅंडर 23, तर केशव महाराज 21 धावांवर खेळत होता.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सकळाच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी अनुकूल परिस्थितीचा अचूक फायदा उठवून दक्षिण आफ्रिकेवर जितके दडपण टाकता येईल तितके टाकले होते. मात्र, कर्णधार फाफ डू प्लेसीची अर्धशतकी खेळी आणि तो बाद झाल्यावर एकत्र आलेल्या फिलॅंडर आणि महाराज यांनी खेळपट्टीवर तग धरताना भारतीय गोलंदाजांना निराश करण्याचे काम केले. या जोडीने आतापर्यंत 35 धावांची भागीदारी केली आहे. दक्षिण आफ्रिका अजून 404 धावांनी पिछाडीवर आहे.

सकाळच्या सत्रात उमेश यादव आणि महंमद शमी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. त्यानंतर अश्विन आणि जडेजा या फिरकी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना जखडून  ठेवले. मात्र, बाद करण्यात त्यांना अपयश आले. अश्विनला दोन्ही वेळा गोलंदाजीची बाजू बदलल्यावर यश आले. 

आता तिसऱ्या दिवसाचे अखेरचे सत्र बाकी आहे. या अखेरच्या दोन तासात दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळण्यात भारताला यश येते का हे पाहणे रंजक ठरणार आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD