INDvsSA : पुणं पावलं; विराटनं ठोकलं सातवं द्विशतक 

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-10-11 17:30:04

img

पुणे : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाऊस कोसळणार अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, पुण्यात पावसाऐवजी भारताचा कर्णधार विराट कोहलीच आफ्रिकेच्या गोलंदाजांवर बरसला. त्याने कसोटी क्रिकेटमधील सातवे द्विशतक झळकाविले आहे. 

त्याने 295 चेंडूमध्ये द्विशतक साजरे केले. त्याने आफ्रिकेच्या कोणत्याच गोलंदाजाला समोर टिकू दिले नाही. कोहलीचे 81 कसोटी सामन्यांमधील हे सातवे द्विशतक आहे. 

दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर वेगवान गोलंदाजांना मिळणारी साथ यामुळे कोहली आणि रहाणे यांना खेळणे कठिण जात होते. अचूक टप्पा आणि दिशा राखून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदजांनी मारा केला. मात्र, कोहली, रहाणे जोडीने त्यांना दाद दिली नाही. बॅटची कड घेऊन गेलेले दोन तीन चौकार वगळता या दोन्ही फलंदाजांचा खेळ त्यांच्या लौकिकास साजेसा असाच होता. त्यानंतर रहाणे 59 धावांवर बाद झाला आणि कोहलीने द्विशतक केले. 

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN