INDvsSA : फाफ डू प्लेसिस, एल्गरने किल्ला लढवला; आफ्रिका चार बाद 153

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-10-04 14:34:26

img

सुनंदन लेले

विशाखापट्टणम : पहिल्या कसोटी सामन्यात विशाखापट्टनमला जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असताना एकदम कडक उन्हामधे तिसर्‍या दिवशीचा खेळ चालू झाला. कप्तान फाफ डू प्लेसिस आणि डीन एल्गरने सकारात्मक फलंदाजी करून भारतीय संघाला मोठ्या यशापासून लांब ठेवले. तिसर्‍या दिवशी उपहाराला खेळ थांबला तेव्हा एल्गर 76  आणि डू प्लेसी 48 धावांवर नाबाद परतले आणि पाहुण्यांची धावसंख्या 4 बाद 153  अशी झाली होती.

तिसर्‍या दिवशीचा खेळ चालू होताना एकदम कडक ऊन होते आणि उकाडाही प्रचंड होता. चिवट फलंदाजीकरता प्रसिद्ध असलेल्या टेंबा बवुमाला इशांत शर्माने पायचित केले तो चेंडू टप्पा पडून आत आला तसेच अपेक्षेपेक्षा थोडा खाली राहिला. ज्या षटकात इशांत शर्माला बवुमाची विकेट मिळाली त्यानंतर लगेचच विराट कोहलीने त्याला बदलून महंमद शमीला गोलंदाजीला का आणले हे समजले नाही.

डीन एल्गर विश्वासाने गोलंदाजांना तोंड देत होता. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कप्तान फाफ डू प्लेसिसने पहिल्या पासून सावध फलंदाजी करणे टाळले. त्याने फिरकी गोलंदाजांवर आडव्या बॅटचे स्वीपचे फटके मारत हल्ला चढवला. पुढे सरसावत अश्विनला डू प्लेसिसने मारलेला षटकार अफलातून होता.

संघातून हकाललेला पंत आता घेतोय 'या' वर्ल्डक्लास विकेटकिपरकडे ट्रेनिंग

एल्गरने अर्धशतक पूर्ण केले. आक्रमक क्षेत्ररचनेचा फायदा घेत दोनही फलंदाजांनी बेधडक फटके मारले. विसाखापट्टनची खेळपट्टी अजून फलंदाजीला पोषक असल्याने आणि हवामान थकवणारे असल्याने भारतीय गोलंदाजांना पहिला डाव संपवायला अजून बरीच मेहनत करावी लागणार आहे. उपहारानंतर फाफ डू प्लेसी - डीन एल्गरची जोडी लवकर तोडण्यात यश मिळाले तरच सामन्यात विजयाची गती सापडणार आहे.  

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD