INDvsSA : भारताची गोलंदाजी जगात भारी; आफ्रिकेला पुन्हा फॉलोऑन

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-10-21 16:35:06

img

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेला केवळ 162 धावांत गुंडाळले आणि आफ्रिकेला पुन्हा फॉलोऑन दिला. रोज कमी प्रकाशामुळे दिवसाचा खेळ लवकर संपत असताना भारतीय संघ सामना लवकर संपवण्याचाच विचार करत असेल. 

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर भरवशाच्या उमेश यादवने पहिल्याच षटकात आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसला केवळ एका धावेवर बाद केले. त्यानंतर आफ्रिकेला जवळपास 30 धावा जोडता आल्या आणि जडेजाने हम्जाची विकेट काढली. त्याने बराचवेळ टिच्चून फलंदाजी करत 62 धावा केल्या होत्या आणि त्याही केवळ 79 चेंडूंमध्ये. त्याने त्याच्या खेळीत तब्बल 10 चौकार मारले. 

28व्या षटकात हम्जा बाद झाल्यावर त्याच्यापाठोपाठ 29व्या षटकात नदीमने बावुमाला 32 धावांवर बाद केले. त्यानंतर जडेजाने 32 व्या षटकात क्लासेनलाही बाद केले आणि आफ्रिकेवर पुन्हा पराभवाचे ढग दाटू लागले. 

img

उपहारापर्यंत आफ्रिकेचा अर्धा संघ माघारी फिरला होता. उपहारानंतर शमीने पहिल्याच षटकात पिएडटला बाद केले. च्याच्या पुढच्याच षटकात अश्विनने रबाडाला भोपळाही न फोडता माघारी धाडले. त्यानंतर बराच काळ टिकून असलेल्या लिंडेला उमेशने बाद केले. पुढील षटकात लगेच नदीमने नार्ट्जेला बाद करत आफ्रिकेचा डाव 162 धावांत गुंडाळला. 

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD