IPL : अश्विनने सोडली पंजाबची साथ, आता 'या' खेळाडूकडे नेतृत्व?

Indian News

Indian News

Author 2019-11-08 10:28:00

img

मुंबई, 08 नोव्हेंबर : भारताचा फिरकीपटू आणि आय़पीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन पुढच्या आयपीएलमध्ये दुसऱ्या संघाकडून खेळणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांनी याची माहिती दिली आहे. अश्विन 2020 मध्ये दिल्लीकडून खेळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नेस वाडिया म्हणाले की, अश्विनला रिलीज करण्याचा निर्णय पंजाबने घेतल्यानंतर दिल्लीने त्याला विकत घेण्यासाठी पावले उचलली होती. याशिवाय इतर संघांनीही अश्विनला घेण्यासाठी हालचाली केल्या होत्या. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पंजाब आणि दिल्लीमध्ये यावर चर्चा सुरू होती. अखेर हा निर्णय घेण्यात आल्याचं नेस वाडिया म्हणाले.

अश्विनला रिलीज करण्यासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबचे नवे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे तयार नव्हते. त्यामुळे अश्विनबाबतच्या निर्णयाला उशिर झाला. कुंबळे यांनी अश्विन पुढच्या हंगामात पंजाबकडून खेळण्याची खात्री नसल्याचं सांगितलं होतं. शेवटी सहमालक नेस वाडिया यांनी अश्विनला रिलीज केल्याचं स्पष्ट केलं.

आयपीएलच्या पुढच्या हंगामात अश्विन दिल्लीकडून खेळणार असल्याने आता पंजाबच्या नेतृत्वाची धुरा कोणाकडे जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामध्ये भारताचा सलामीवीर केएल राहुल कर्णधार होण्याची शक्यता आहे. दोन हंगामापासून तो पंजाबकडून खेळतो. गेल्या हंगामात त्यानं चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे पंजाबचे कर्णधारपद त्याला दिलं जाण्याची शक्यता आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD