IPL मध्ये आता 'Power Player'; जाणून घ्या, काय आहे हे नवं प्रकरण!

Indian News

Indian News

Author 2019-11-04 17:13:43

img

इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील मोसमात बरेच बदल पाहायला मिळणार आहेत. खेळाडूंच्या अदलाबदली बरोबरच संघ संख्येत होणारी वाढ ही क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीची ठरणार आहे. पण, याहीपेक्षा आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) आयपीएलमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयानुसार 2020च्या मोसमात 'Power Player' ही नवी संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यामुळे सामन्यासाठी मैदानावर उतरणाऱ्या दोन्ही संघांना प्रत्येकी 15-15 जणांचा संघ जाहीर करावा लागणार आहे.


IANS या वृत्तसंस्थेला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं ही माहिती दिली. 'Power Player' या संकल्पनेला मान्यता मिळाली असून या संदर्भात आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत यावर चर्चा केली जाणार आहे. मुंबईतील बीसीसआयच्या मुख्यालयात मंगळवारी या संदर्भात बैठक होणार आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की,''सामन्यापूर्वी संघांनी आपापले अंतिम 11 शिलेदार जाहीर न करता प्रत्येकी 15 खेळाडूंची नाव सांगावित. त्यानुसार विकेट गमावल्यानंतर किंवा सामन्यातील एका टप्प्यानंतर बदली खेळाडू मैदानावर उतरवला जाईल. ही संकल्पना आता आयपीएलमध्ये राबवण्याचा प्रयत्न आहे. याची चाचपणी आम्ही आगामी मुश्ताक अली चषक स्पर्धेत करणार आहोत.''

या संकल्पनेबाबत विस्तारानं सांगताना अधिकारी म्हणाले की,''Power Player मुळे सामन्यातील चुरस अधिक वाढणार आहे आणि हा निर्णय एखाद्या सामन्याला कलाटणी देणाराही ठरू शकतो. त्यामुळे प्रेक्षकांनाही खिळवून ठेवता येईल. कल्पना करा की तुम्हाला 6 चेंडूंत 20 धावा हव्या आहेत आणि तुमच्या डग आऊटमध्ये आंद्रे रसेल बसला आहे. त्याला काही कारणास्तव अंतिम 11मध्ये स्थान दिलेले नाही. पण, या नव्या संकल्पनेमुळे तो ती सहा चेंडूं खेळण्यासाठी मैदानावर उतरू शकतो.''


''तसेच अखेरच्या षटकात प्रतिस्पर्धी संघांला सहा धावाच हव्या आहेत आणि तुमच्याकडे जसप्रीत बुमराह सारखा हुकुमी खेळाडू डग आऊटमध्ये आहे. त्यावेळी कर्णधार नक्की बुमराहचा विचार करू शकतो,'' असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

KKRनं शेअर केलेल्या फोटोत लपलाय क्रिकेटपटू, बघा तुम्हाला सापडतोय का?

IPLचा कालावधी वाढणार, रात्रीस खेळ चालणार; बीसीसीआय लवकरच घोषणा करणार

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD