IPL 2020 : अँड्रू मॅक्डोनाल्ड राजस्थान रॉयल्सचे नवीन प्रशिक्षक

Loksatta

Loksatta

Author 2019-10-21 18:12:45

img

ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू अँड्रू मॅक्डोनाल्ड यांची राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. पॅडी अपटन यांच्याजागी मॅक्डोनाल्ड आगामी हंगामात राजस्थान रॉयल्स संघाला प्रशिक्षण देणार आहेत. अपटन यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या हंगामात राजस्थानचा संघ शेवटून दुसऱ्या स्थानावर राहिला होता.

३८ वर्षीय मॅक्डोनाल्ड यांनी ऑस्ट्रेलियाकडून ४ कसोटी सामने खेळले आहेत. मात्र स्थानिक क्रिकेटमध्ये प्रशिक्षक म्हणून मॅक्डोनाल्ड यांनी चांगली कामगिरी केली आहे. २०१८-१९ साली मॅक्डोनाल्ड यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिक्टोरिया संघाने ऑस्ट्रेलियातील स्थानिक वन-डे संघाचं विजेतेपद पटकावलं होतं.

याव्यतिरीक्त मेलबर्न रेनिगेड्स संघाला बिग बॅश लिग स्पर्धेचं पहिलं विजेतेपद मिळवून देण्यात मॅक्डोनाल्ड यांचा महत्वाचा वाटा होता. २०१८ साली मॅक्डोनाल्ड रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते. त्यामुळे आगामी हंगामात नवीन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN