IPL 2020 : आता IPLमधली राडेबाजी होणार बंद, BCCIनं घेतला मोठा निर्णय

Indian News

Indian News

Author 2019-11-05 21:48:00

img

मुंबई, 05 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट बोर्डाचे नवे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर क्रिकेटमध्ये मोठे बदल केले. सौरव गांगुलीनं अध्यक्षपद स्वीकारताच भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच डे-नाईट क्रिकेटला सुरुवात होणार आहे. दरम्यान आता इंडियन प्रिमीअर लीगला अधिक सक्षम आणि रोमांचक करण्यासाठी विविध नवे नियम लागू केले जाणार आहेत.

याआधी बीसीसीआयच्या वतीनं पॉवर प्लेअर हा नियम आणण्याचा प्रस्ताव आणला होता. यानुसार आयपीएलमध्ये आता 11 नाही तर 15 खेळाडू खेळणार आहेत. बीसीसीआयच्या वतीनं आता आणखी एक नवा नियम अंमलात आणला जाणार आहे. याआधी वर्ल्ड कपमध्ये पंचाचे चुकीचे निर्णय चांगलेच गाजले.

त्यामुळं आयसीसीच्या वतीनं आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही चार पंच असणार आहेत. आता आयपीएलला सक्षम करण्यासाठी या स्पर्धेतही चार पंच असणार आहेत. यातील चौथ्या पंचाचे काम खास असणार आहे.

आयपीएलमध्ये गेल्या हंगामात पंचांनी घेतेले चुकीचे निर्णय चर्चेत होते. आयपीएलच्या गेल्या हंगामात पंचाच्य निर्णयाचा फटका बऱ्याच संघांना बसला. मुख्यत: नो-बॉलबाबत पंचांकडून चुकीचे निर्णय घेण्यात आले. दरम्यान आता स्पोर्ट्स स्टारनं दिलेल्या बातमीनुसार फक्त नो-बॉलवर लक्ष ठेवण्यासाठी आता एका पंचाची नेमणुक करण्यात येणार आहे. बीसीसीआयचे प्रमुख आणि आयपीएलची शासित समिती यांनी याबाबत चर्चा केली.

आयपीएलच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत, "सामनादरम्यान चूका कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यासाठी नो-बॉलचा निर्णय घेण्यासाठी एका विशेष पंचांची नेमणुक करण्यात येणार आहे. चौथा पंच आणि मैदानावरील उपलब्ध पंच आणि तिसरे पंच यांच्यासोबत काम करतील", असे सांगितले.

आयपीएलच्या आधी प्रथम श्रेणीमध्ये होणार नियम लागू

आयपीएलमध्ये चौथ्या पंचांचा नियम लागू करण्याआधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये याचा प्रयोग केला जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार येत्या काही स्पर्धांमध्ये याचा प्रयोग होऊ शकतो. याचबरोबर रणजी ट्रॉफीमध्येही हा नियम लागू होऊ शकतो.

पॉवर प्लेयरचे नियम 13व्या हंगामात होणार नाही लागू

यावेळी आयपीएलच्या समिती प्रमुखांनी पॉवर प्लेअर नियमाबाबत चर्चा केली. या नियमामुळं प्रत्येक संघात 15 खेळाडूंची निवड होऊ शकते. त्यामुळं 11 खेळाडू मैदानावर असतील आणि 4 खेळाडू प्लेयिंग इलेव्हनमध्येच असतील पण संघात त्यांना गरज पडेल तसे, घेण्यात येईल.याआधी फक्त क्षेत्ररक्षण करण्यासाठी फक्त इतर खेळाडू उतरत होते, आता हे चार खेळाडू बदली खेळाडू म्हणून फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी उतरतील. मात्र आयपीएल 2020मध्ये हा नियम लागू होणार नाही, असेही यावेळी सांगण्यात आले.

डिसेंबरमध्ये होणार खेळाडूंचा लिलाव

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव हा 19 डिसेंबरला कोलकातामध्ये होणार आहे. हा लिलाव एका दिवसाचा असून, याआधी बंगळुरूमध्ये हा लिलाव झाला होता. मात्र आता कोलकातामध्ये हा लिलाव होणार आहे.

सर्व संघ जाणार अमेकिरा दौऱ्यावर

मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद या संघांनी बीसीसीआयला आयपीएलआधी सराव सामने खेळण्याची परवानगी मागितली आहे. यामुळं आयपीएलचा जगभरात विस्तारही होईल. त्याचबरोबर खेळाडू मुख्य स्पर्धेआधी सराव सामनेही खेळती. दरम्यान बीसीसीआयचे काही अधिकारी आयपीएलच्या मुख्य समितीसोबत याबाबत विस्तृतमध्ये चर्चा करतील.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD