भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत मोठा विजय

Indian News

Indian News

Author 2019-10-06 16:22:43

img

विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 2 ते 6 ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 203 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारताने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 395 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात सर्वबाद 191 धावा करता आल्या. भारताकडून या डावात मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजाने 4 आणि आर अश्विनने 1 विकेट्स घेतली.

दक्षिण आफ्रिकेकडून या डावात डेन पिड्तने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली.

तसेच त्याने सेनुरन मुथुसामीबरोबर 9 व्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी रचत भारताला चांगली झूंज दिली होती. मुथुसामीनेही नाबाद 49 धावांची खेळी करत चांगली लढत दिली. मात्र अन्य फलंदाजांना खास काही करता आले नसल्याने दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

तत्पूर्वी भारताने दुसरा डाव 4 बाद 323 धावांवर घोषित केला होता. तसेच पहिल्या डावात घेतलेल्या 71 धावांच्या आघाडीसह दक्षिण आफ्रिकेला 395 धावांचे आव्हान दिले होते.

भारताकडून दुसऱ्या डावात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे. त्याने 149 चेंडूत 127 धावा करताना 10 चौकार आणि 7 षटकार मारले आहेत. तसेच त्याने चेतेश्वर पुजाराबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 169 धावांची भागीदारीही रचली आहे. पुजारा 81 धावा करुन बाद झाला. त्याचबरोबर जडेजाने 40 धावांची छोटेखानी खेळी केली.

दक्षिण आफ्रिकेकडून या डावात केशव महाराजने 2 विकेट्स, तर वर्नोन फिलँडर आणि कागिसो रबाडाने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.

त्याआधी या सामन्यात भारताने पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला होता. तसेच दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 431 धावांवर संपुष्टात आला होता.

संक्षिप्त धावफलक -

भारत पहिला डाव - 7 बाद 502 धावा (घोषित)

दक्षिण आफ्रिका पहिला डाव - सर्वबाद 431 धावा

भारत दुसरा डाव - 4 बाद 323 धावा (घोषित)

दक्षिण आफ्रिका दुसरा डाव - सर्वबाद 191 धावा

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN