टेस्ट क्रिकेटच्या 'वर्ल्ड कप'मध्ये टीम इंडिया सुसाट, पाहा कोण कितव्या स्थानी

News18

News18

Author 2019-10-06 15:02:00

img

विशाखापट्टणम, 06 ऑक्टोबर : आयसीसीच्या वतीनं कसोटी क्रिकेटला वाव मिळावा यासाठी अशेस मालिकेपासून टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपला सुरुवात झाली. 2021पर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे, या स्पर्धेअंती ज्या दोन संघांकडे जास्त गुण असतील ते संघ 2021मध्ये इंग्लंडमध्ये अंतिम सामना खेळतील. अंतिम सामना जिंकणारा संघ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात पहिले टेस्ट वर्ल्ड कप विजेतेपद मिळवेल.

दरम्यान या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर वेस्ट इंडिज विरोधात मालिका विजय मिळल्यानंतर आफ्रिकेच्या शिकार करणारा भारतीय संघ आहे. टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत 160 गुणांसह भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0नं आघाडी मिळवली आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात रोहित शर्मानं दोन्ही डावांत मिळून 303 धावा केल्या. तर गोलंदाजीमध्ये अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी यांनी कमाल केली. फलंदाज आणि गोलंदाजांच्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर भारतानं 203 धावांनी पहिला सामना जिंकला, यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पहिले स्थान कायम राखले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या गुणतालिकेत कोणताही संघ भारताच्या जवळपासही नाही.

वाचा-टीम इंडियाची शानदार कामगिरी, दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

img

गुणतालिकेत 60 गुणांसह दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा संघ आहे. तर, 60 गुणांसह श्रीलंकेचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर 56 गुणांसह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. तर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि पाकिस्तान यांनाही एकही गुण अद्याप मिळवता आलेला नाही.

वाचा-फलंदाजाला बोल्ड झाल्याचं कळालच नाही, पाहा शमीचा तुफानी इनस्विंग

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये काय आहे

एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्ड कपच्या धर्तीवर पहिल्यांदाच टेस्ट चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. यात एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्ड कप प्रमाणे खेळाडूंच्या जर्सीवर त्यांचे नाव आणि जर्सी नंबर असणार आहे. याआधी कसोटी क्रिकेटमध्ये पांढऱ्या रंगाच्या जर्सीचा वापर केला जात होता.

असे आहेत टेस्ट चॅम्पियनशीपचे नियम

या स्पर्धेत आयसीसी क्रमवारीत असलेल्या टॉप 9 संघांना खेळण्याची संधी मिळणार आहे. यात संघ आपले प्रतिस्पर्धी संघ स्वतः निवडतील. संघांना दोन कसोटी सामने खेळणे अनिवार्य आहे. यात तीन मालिका घरच्या मैदानावर होणार आहेत. मालिका 2 ते 5 सामन्यांची असू शकते. यात प्रत्येक सामन्यात जिंकणाऱ्या संघाला 120 गुण मिळणार आहेत. दरम्यान गुण हे प्रत्येक सामन्यावर दिले जातील, मालिकेवर असणार नाही.

वाचा-विमान नाही, पक्षी नाही; हा तर निघाला सर जडेजा! अफलातून कॅचचा VIDEO

VIDEO : माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN