TikTok वर चर्चा रोहित शर्माचीच, हे व्हिडीओ पाहणं चुकवू नका!

News18

News18

Author 2019-10-04 06:56:00

img

जर तुम्ही टीकटॉकचे चाहते असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहीत असेल की दरदिवशी इथे दरदिवशी पाच व्हिडीओ हे ट्रेण्डमध्ये असतात. आज टिकटॉक अॅपवर क्रिकेटर रोहित शर्माच्याच नावाची चर्चा आहे. कसोटी सामन्यात पहिल्यांदा सलामीवीर म्हणून उतरलेल्या रोहित शर्माने 176 धावांची खेळी खेळली. विशेष म्हणजे रोहितने या धावा 244 चेंडूत केल्या. त्याने 6 षटकार आणि 23 चौकारांच्या मदतीने 176 धावा केल्या. सध्या त्याचे शॉट टिकटॉकवर व्हायरल होत आहेत. त्याने कसोटी सामना हा एखादा टी20 सामना असल्याप्रमाणे खेळला. याशिवाय व्हायरल झालेल्या व्हिडीओत लग्नाच्यावेळी मुलगी बाबांना पाहून ढसा ढसा रडत आहे.

लग्नाच्याआधी वडिलांना पाहून ढसाढसा रडली मुलगी- हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल यात काही शंका नाही. या व्हिडीओमध्ये मुलीला हळद लावताना वडील दिसत आहेत. वडिलांना पाहताचक्षणी ती रडायला लागते. सध्या हा व्हिडीओ टॉप ट्रेण्डमध्ये आहे.

नवरात्रीमध्ये दांडिया, गरबा यांची धूम असते. सालाबादप्रमाणे यावर्षीही तरुणाईमध्ये गरब्याची क्रेझ पाहायला मिळते. या व्हिडीओमध्ये ती सुंदर डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती 20 लीटरच्या बाटलीमधून अनोख्या पद्धतीने पाणी काढताना दिसत आहे.

एक मुलगा त्याच्या पाळीव कुत्र्याला बिस्किट शोधायला सांगतो. तो कुत्राही शिताफीने त्याच्या हातातलं बिस्किट वास घेऊन शोधून काढतो. या व्हिडीओला आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

काँग्रेस नेत्यांमधील वाद कॅमेऱ्यात कैद; उमेदवारीवरून नाराजीचा VIDEO VIRAL

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD