U-19 : आफ्रिकेत रंगणार विश्वचषकाचा थरार

Indian News

Indian News

Author 2019-10-25 14:58:13

img

भारताचा 'अ' गटात समावेश

केपटाऊन - पुढील वर्षी 2020 च्या सुरूवातीलाच क्रिकेटप्रेमींना विश्वचषकाची मेजवानी मिळणार आहे. आयसीसीने 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेची घोषणा केली आहे. १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा रंगणार आहे. गतविजेत्या भारताचा अ गटात समावेश करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील 4 शहरांमध्ये ही या स्पर्धेचे सामने खेळवण्यात येणार आहेत. भारतासोबतच अ गटामध्ये न्यूझीलंड, श्रीलंका, जपान या देशांचा समावेश करण्यात आला आहे. तर ब गटामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, नायजेरिया या देशांचा समावेश असणार आहे, तर क गटामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, झिम्बाब्वे, स्कॉटलंड आणि ड गटामध्ये अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, युएई, कॅनडा या देशांचा समावेश आहे.

२०२० विश्वचषकासाठी अशी असेल गटवारी -

अ गट - भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, जपान

ब गट - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, नायजेरिया

क गट - पाकिस्तान, बांगलादेश, झिम्बाब्वे, स्कॉटलंड

ड गट - अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, युएई, कॅनडा

याचसोबत सर्व संघाना सरावासाठी आयसीसीने १२ ते १५ जानेवारीदरम्यान जोहान्सबर्ग आणि प्रिटोरीया येथे सरावसामने आयोजित केले आहेत.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN