Video : 'तारक मेहता'च्या भिडे गुरुजींचा विराट कोहलीला टोमणा

Lokmat

Lokmat

Author 2019-09-30 09:08:11

Lokmat30 Sep. 2019 09:08

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे आणि एक कर्णधार म्हणूनही त्यानं स्वतःला सिद्ध केलं आहे.

img

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे आणि एक कर्णधार म्हणूनही त्यानं स्वतःला सिद्ध केलं आहे. पण, तरीही आयसीसीची एकही मुख्य स्पर्धा त्याला जिंकता आलेली नाही. नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतही टीम इंडियाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. वर्ल्ड कप जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या टीम इंडियाला असा पराभव पत्करावा लागेल, हे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. तो धक्का अजूनही पचवणे अवघड आहे. त्या पराभवाची आठवण करून द्यायचं कारण की, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील भिडे गुरुजी ( आत्माराम भिडे) यांनी त्या पराभवावरून कर्णधार कोहलीला सणसणीत टोमणा मारला आहे.

तारक मेहताच्या 2828व्या भागात भिडे गुरुजी एक कोडं सोडवताना दाखवले आहेत. त्यात त्यांना सातत्यानं जिंकणारा असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी लगेच विराटचे नाव घेतले, परंतु त्यांची कन्या सोनूनं ते उत्तर चुकीचं असल्याचे सांगितले. त्यानंतर भिडे गुरुजींनी त्यावरून कोहलीला टोमणा हाणला.

पाहा व्हिडीओ... 

संदर्भ पढ़ें

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN