Video : गेला बॉल कुणीकडे! भर मैदानात लपंडाव

Loksatta

Loksatta

Author 2019-10-03 21:49:32

img

पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर आधी धमाकेदार फलंदाजी आणि त्यानंतर अप्रतिम भारतीय फिरकी गोलंदाजी यामुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली. पहिला डाव ७ बाद ५०२ वर भारताने घोषित केल्यानंतर भारताच्या रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. इडन मार्क्रम (५) आणि थेनीस डी ब्रुन (४) यांना अश्विनने माघारी धाडले. तर नाईट वॉचमन डेन पीटला जाडेजाने शून्यावर तंबूत पाठवले. त्यामुळे भारताने सामन्यावर पकड मिळवली.

सामन्यात भारताच्या फलंदाजीच्या वेळी १२९ व्या षटकात एक अतिशय मजेशीर किस्सा घडला. जाडेजाने लगावलेला फटका थेट सीमारेषेवर गेला. त्यामागे आफ्रिकेचा फिल्डर वर्नन फिलंडर धावत होता. पण त्याला चेंडू अडवता आला नाही. चेंडू सीमारेषेवर गेल्यानंतर खूप वेळ फिलंडर आणि बॉल-बॉय चेंडू शोधत बसले. पण चेंडू सीमारेषेवर असलेल्या रोपमध्ये अडकलेला कोणालाच समजला नाही. त्यामुळे समालोचकांनाही हसू आवरले नाही. अखेर मार्क्रमने सीमारेषेवर जाऊन चेंडू काढला आणि मग खेळ सुरू झाला.

दरम्यान, सलामीवीर मयांक अग्रवालचे द्विशतक (२१५) आणि रोहित शर्माचे दीडशतक (१७६) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर पहिल्या कसोटी सामन्यात भारताने धावांचा डोंगर उभा केला. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ३१७ धावांची भागीदारी केली. पण भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पहिल्या डावात निराशा केली. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी आणि वृद्धिमान साहा हे फलंदाज झटपट माघारी परतले. त्यामुळे भारताने ७ बाद ५०२ या धावसंख्येवर डाव घोषित केली.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD