Video : गोलंदाजाने स्वत:च पकडला भन्नाट कॅच; फलंदाजही झाला अवाक

Loksatta

Loksatta

Author 2019-10-14 11:35:05

img

क्रिकेटच्या मैदानात रोज नवनवे किस्से घडत असतात. क्रिकेटच्या सामन्यात केव्हा काय होईल याचा काहीही नेम नसतो. कधी एखादा फलंदाज सामना फिरवतो, तर कधी एखादा गोलंदाज हातात असलेला सामना सुमार कामगिरीमुळे गमावतो. काही वेळा क्षेत्ररक्षक एखादा सोपा कॅच सोडतो, तर कधी खेळाडू एखादा असा झेल पकडतो की सारे अवाक होतात. नुकताच एका परदेशी क्रिकेट लीग स्पर्धेत असा एक कॅच पाहायला मिळाला.

कॅरेबियन प्रिमिअर लीग (CPLT20) या स्पर्धेत इंग्लंडचा ख्रिस जॉर्डन याने एक अफलातून कॅच पकडला. त्रिनबॅगो नाईट रायडर्स आणि बार्बाडॉस ट्रायडंट्स या दोन संघांमध्ये सामना सुरू होता. या सामन्यात १५ वे षटक टाकण्यासाठी जॉर्डन आला. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कार्टरने बचावात्मक फटका खेळला. पण तो फटका चुकला. बॅटची कड लागून चेंडू उडला आणि क्षणार्धात जॉर्डनने हवेत उडी मारत भन्नाट कॅच पकडला. त्याने कॅच पकडला हे पाहून फलंदाजदेखील काही काळ अवाक होऊन त्याच्या कडे पहात उभा राहिला.

सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, तो सामना मात्र जॉर्डनच्या त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाला जिंकता आला नाही. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बार्बाडॉस ट्रायडंट्सने १६० धावा केल्या. १६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघ मात्र १४८ धावाच करू शकला.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN