Video : चेंडू लागून गोलंदाज मैदानावरच कोसळला आणि...

Loksatta

Loksatta

Author 2019-11-04 18:32:38

img

देवधर चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत ब आणि भारत क या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला. या सामन्यात एका गोलंदाजाला चेंडू लागल्याची घटना घडली. भारत ब संघ प्रथम फलंदाजी करत असताना ४७ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ही घटना घडली. भारत क संघाचा गोलंदाज इशान पोरेल हा गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेला चेंडू फलंदाजाने टोलवला. चेंडू गोलंदाजाच्या दिशेने गेला. चेंडू चुकवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला, पण त्याच वेळी चेंडू इशानच्या घोट्याला लागला.

img

चेंडू घोट्याला लागल्यानंतर इशानला असह्य वेदना झाल्या आणि तो जमिनीवर कोसळला. बराच वेळ इशान मैदानावर पडून होता. पण काही काळाने तो उठला आणि त्याने show must go on या उक्तीप्रमाणे पुन्हा गोलंदाजी करत आपली १० षटके पूर्ण केली. इशानने आपल्या १० षटकात दमदार कामगिरी केली. त्याने १० षटकात ४३ धावा देत ५ बळी टिपले.

पहा व्हिडीओ –

दरम्यान, भारत ब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्याकडून यशस्वी जैस्वालने ५४ धावा केल्या. तो बाद झाल्यावर अनुभवी केदार जाधवने धमाकेदार खेळी केली. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार खेचत ८६ धावांची खेळी केली. विजय शंकरने ४५ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. तर शेवटच्या टप्प्यात कृष्णप्पा गौतमने १० चेंडूत ३५ धावा ठोकल्या. या साऱ्यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारत ब संघाने ७ बाद २८३ धावांपर्यंत मजल मारली. इशान पोरेलने त्यांचा अर्धा संघ माघारी धाडला.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD