Video: चौकार गेल्यानंतर का धावत होता फलंदाज?

Loksatta

Loksatta

Author 2019-10-12 18:17:13

img

क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा एखाद्या संघाकडून खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते, तेव्हा क्रिकेटपटू आपल्या संघाला सामना जिंकवून देण्यासाठी आणि विजयाचा चषक उंचावण्यासाठी काहीही करू शकतात. क्रिकेट हा एक असा खेळ आहे, जो ठिकठिकाणी पाहिला तर जातोच, पण त्यासह त्या खेळाचे जगभरात चाहते आहेत. काही वेळा खेळाडू आपल्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या क्षमतेपेक्षाही अधिक काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यात कधी कधी खेळाडूंचंच हसं होतं.

नुकतीच अशी एक घटना क्रिकेटच्या मैदानावर घडली. शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत एका खेळाडूने एक अशी गोष्ट केली की त्यामुळे केवळ मैदानावरीलच नव्हे, तर घरी पाहून सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांना हसू आवरणे कठीण गेले असेल.

नक्की काय घडलं?

शेफिल्ड शिल्ड सामन्यात एका फलंदाजाने स्लिपच्या दोन खेळाडूंच्या मधून फटका मारला. चेंडू इतक्या खुबीने टोलवण्यात आला की चेंडूने थेट सीमारेषा गाठली. पण फलंदाजाला मात्र या गोष्टीचा मागमूसही नव्हता. त्यामुळे चेंडू सीमारेषेपार गेल्यानंतरही फलंदाज मात्र धाव घेतच राहिला. अखेर ज्यावेळी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी त्याच्या ही बाब निदर्शनास आणून दिली, तेव्हा तो देखील स्वत:वर हसत राहिला.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा व्हिडीओ स्वत:च्या ट्विटरवर शेअर केला आहे. त्याला एक झकास कॅप्शनदेखील दिले आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN