Video : मैदानावर आपापसातच भिडले आफ्रिकेचे खेळाडू

Loksatta

Loksatta

Author 2019-10-11 17:05:20

img

पुण्याच्या गहुंजे स्टेडिअमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने दीडशतक ठोकले. त्याच्या खेळीच्या बळावर भारत दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात आणखी मजबूत स्थितीत पोहोचला. उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्यासोबत शतकी भागीदारी करताना विराटने कसोटी कारकिर्दीतील २६ वे शतक लगावले. आधी उपकर्धार अजिंक्य रहाणे आणि नंतर रवींद्र जाडेजाने त्याला चांगली साथ दिली.

IND vs SA : धोनीलाही जे जमलं नाही, ते विराटने करून दाखवलं…

पहिल्या डावावर भारताने पूर्णपणे वर्चस्व गाजवले. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी प्रयत्नांची शर्थ केली. तरीही भारताने डोंगराएवढ्या धावसंख्येपर्यंत मजल मारली. या चिडचिडीमुळे सामन्यात एक वेगळाच किस्सा बघायला मिळाला. आफ्रिकेच्या संघातील दोन खेळाडूंमध्ये मैदानावरच राडा पाहायला मिळाला.

कागिसो रबाडा गोलंदाजी करत असताना फलंदाजाने टोलवलेला चेंडू त्याच्याकडे आला. फलंदाज धाव घेऊ नये म्हणून रबाडाने आक्रमक पवित्रा घेत चेंडू स्टंपच्या दिशेने फेकला. पण चेंडू थेट यष्टीरक्षक क्विंटन डी कॉककडे गेला. रबाडा चेंडू फेकेल अशी डी कॉकला अपेक्षा नव्हती. त्यामुळे तो चेंडू त्याच्याकडून सुटला आणि भारताने एक चोरटी धाव घेतली. या प्रकारानंतर रबाडा आणि डी कॉक यांच्यात शाब्दिक चकमक दिसून आली.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN