Vienna Marathon : केनियाच्या एल्युड किपजॉजची विक्रमी कामगिरी

Loksatta

Loksatta

Author 2019-10-12 18:09:41

img

केनियाचा धावपटू एल्युड किपजॉजने शनिवारी ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली आहे. विएन्ना येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत एल्युड किपजॉजने दोन तासांच्या आत मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली. अशी कामगिरी करणारा एल्युड पहिला धावपटू ठरला आहे. १ तास ५९ मिनीटं आणि ४०.२ सेकंदात एल्युडने ही शर्यत पूर्ण केली.

३४ वर्षीय एल्युड किपजॉजने याआधी बर्लिन मॅरेथॉनमध्ये २ तास १ मिनीट आणि ३९ सेकंदात शर्यत पूर्ण करत विक्रम नोंदवला होता. आपल्या याच कामगिरीचा विक्रम मोडत एल्युडने ऐतिहासीक कामगिरी केली आहे. या कामगिरीनंतर एल्युडने पत्रकारांशी बोलताना समधान व्यक्त केलं. “माझ्या कामगिरीवरुन लोकांनी प्रेरणा घ्यावी असं मला वाटतं. माणसासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आज मी ही ऐतिहासीक कामगिरी करु शकलो याचा मला आनंद आहे.”

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN