Virat Kohli's 31st birthday: बर्थडेच्यादिवशी विराटनं कोणाला लिहिलं खास पत्र
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज ३१ वा वाढदिवस आहे. ३१ व्या वाढदिवसानिमित्त,आपल्या जीवनातील १५ वर्षांचा प्रवास कसा होता. हे त्यानं एका पत्राद्वारे सोशल मीडियावर शेअर केलं आहे. ५ नोव्हेंबर 2019 रोजी उत्तम फलंदाज आणि कर्णधार विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. क्रिकेटच्या सुरूवातीच्या काळापासून ते भारताचा उत्कृष्ट कर्णधार होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता. तसेच आपल्या जीवनात कशापद्धतीने बदल घडून आले. अशा सर्व प्रकारच्या गोष्टी त्यानं चाहत्यांना सांगितल्या आहेत.
विशेषत: तरूण पिढीलाही विराटनं सल्ला दिलाय की, जीवनात अनेक चढ- उतार येत असतात. त्यामुळे त्या प्रसंगावर मात करत, पुढे जायला शिका. कारण आपल्या आयुष्यात संधी ही एकदाच येते. त्यासाठी आपण नेहमी सतर्क राहिलं पाहीजे. इतरांची काळजी घेणं सोडा आणि आयुष्यात येणाऱ्या अयशस्वी मार्गांना दूर करा.
My journey and life's lessons explained to a 15-year old me. Well, I tried my best writing this down. Do give it a read. #NoteToSelfpic.twitter.com/qwoEiknBvA
— Virat Kohli (@imVkohli) November 5, 2019
३१ व्या वाढदिवसानिमित्त विराट कोहलीनं लिहिलं १५ वर्षीय चिकूला पत्र :
विराटनं सगळ्यात पहिलं चिकूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. मला माहिती आहे की, तुझ्या भविष्याबाबत विचारण्यासाठी माझ्याकडे भरपूर प्रश्न असतील. पण मला माफ कर!. कारण मी त्यांची उत्तरं आता देऊ शकत नाही. कारण जीवनात येणाऱ्या संकटावर आपण कशापद्धतीने मात करू शकतो. हेच आपण आयुष्यात शिकतो. तुला या गोष्टीवर विश्वास नाही बसणार की, इकडे मुक्काम करण्याआधी प्रवासचं जास्त असतो. पण आतापर्यंतचा प्रवास सुखाचा होता.
मला सांगायचयं की , जीवनात कितीतरी मोठ्या गोष्टी आहेत. त्यामुळे जीवनात येणाऱ्या प्रत्येक आव्हानासाठी आपल्याला तयार रहावं लागतं. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हणतात. त्यामुळे जीवनात अपयश आलं तरी घाबरू नको, प्रयत्न करत रहा. आणि कामात सातत्य ठेव. तुला भरपूर लोकांचे प्रेम मिळेल किंवा नाही. त्यामुळे लोकांची काळजी करणं सोड आणि स्वत:वर विश्वास ठेव. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपल्यावर भरपूर प्रेम करते. पण ते आपल्याला समजून येत नाही. त्यामुळे आपल्या पालकांवर आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा आदर करा. त्यांच्यावर प्रेम करा आणि शक्य असेल तितका वेळ त्यांना द्या. वडिलांवर तुम्ही किती प्रेम करता. या सर्व गोष्टी त्यांना सांगा.